breaking-newsआंतरराष्टीय

भारत सरकारने जारी केला एअर स्ट्राइकचा व्हिडिओ

भारत सरकारने एअरस्ट्राइकचे व्हिडिओ जारी केले आहेत. २६ फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये भारताची लडाऊ विमाने उडण्यापासून ते निशाणा साधण्यापर्यंतचे अनेक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये झालेल्या हवाईदल दिनानिमित्त झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये हा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.

भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीच्या पहाटे पावणेचार वाजता पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-महम्मदच्या तळावर हवाई हल्ले करुन हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान ‘जैश-ए-महम्मद’च्या भीषण हल्ल्याला उत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती.

फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रं उद्ध्वस्त केली. या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या हवाई दलाच्या पाच वैमानिकांचा त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी हवाई दलाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button