breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा जाहिर पाठिंबा

गडचिरोली |

मराठा समाजातील मूठभर दलाल भांडवलदार मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. तेव्हा मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळय़ांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्याकरिता मैदानात उतरावे. भारतीय क्रांतीचा विजय करण्याकरिता क्रांतीला अभिप्रेत असलेल्या विचारांनी आपली ताकद मजबूत करा. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत असून तुमची वाट पाहत आहे, असे म्हणत माओवादी राज्य समिती सचिव सहय़ाद्री याने मराठा आरक्षणाला नक्षलींचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

काही नेते ते तुमच्यात मिरवीत आहे व मराठय़ांचे कैवारी असल्याचा आव आणत आहे. हे सगळे धुर्त राजकारणी आहेत हे शेवट तुम्हाला धोकाच देणार आहेत. त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. आपल्यात असलेल्या इनामदार खऱ्या शक्तीला ओळखा. आरक्षण हा मात्र खुळखुळा आहे. खुळखुळय़ांसाठी शक्ती कशाला खर्ची घालता. ही व्यवस्थाच सडली आहे. केवळ मराठाच नाही तर सर्व आम जनतेच्याच जीववार ही उठली आहे. केवळ आर्थिकच नाही आता तर, वास्तविक सर्वाच्या समग्र विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवबांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मराठा समाजाने पुढाकार घेतला होता परत एकदा पुढाकार घ्यायची वेळ आली आहे. तेव्हा परत एकदा मावळे बनावे लागेल. परत एकदा गमिणी काव्याचे डावपेच वापरावे लागेल, असेही माओवादी संघटनेने या पत्रात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button