breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: ‘कोरोना’चा परिणाम: १२ हजार नोकऱ्या जाणार, ब्रिटिश एअरवेजचे स्पष्ट संकेत

करोना व्हायरस महामारीचे परिणाम आता हळूहळू दिसायला सुरूवात झाली आहे. बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन असल्याने अनेक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर संकट येईल अशी शक्यता व्यक्त होत असताना आता आघाडीची विमान सेवा देणारी कंपनी ब्रिटिश एअरवेजने तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

विमान सेवा पुरवणाऱ्या जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ब्रिटिश एअरवेजची पॅरेंट कंपनी इंटरनॅशनल एअरलाइन्स ग्रुपने (आयएजी)याबाबत मंगळवारी माहिती दिली. “हवाई वाहतूक पूर्वपदावर यायला काही वर्ष लागू शकतात, त्यामुळे १२ हजार जणांना नोकरीवरुन कमी करावे लागू शकते”, असे एका निवेदनाद्वारे आयएजीकडून सांगण्यात आले आहे.

पहिल्या तिमाहीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागल्याचं आपल्या निवेदनामध्ये नमूद करत आयएजीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कपातीबाबतचा स्पष्ट इशारा दिला.

करोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. त्यामुळे बहुतांश विमान वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याचा परिणाम आता विमान सेवा पुरवणाऱ्यांवर व्हायला सुरूवात झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button