breaking-newsराष्ट्रिय

IIT-JEE प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा कार्तिकेय देशात पहिला

Indian Institute of Technology (आयआयटी) प्रवेशसाठीची IIT-JEE Advanced प्रवेश परीक्षेचा परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ताने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. je&erdved.aced.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन निकाल पाहाता येणार आहे. २७ मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.

जेईई मुख्य सामायिक प्रवेश परीक्षेत कार्तिकेय चंद्रेश गुप्ता यांनी १०० पर्सेटाइल गुण घेत देशातील पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते. IIT-JEE Advanced परीक्षेत १०० एनटीए गुण घेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा जेईईमध्ये पर्सेटाइल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब करण्यात आला. जागतिक स्तरावर वापरली जाणारी आणि अधिक शास्त्रशुद्ध अशी ही पद्धत आहे.

असा पाहा निकाल

– पुढीलपैकी कोणत्याही अधिकृत बेबसाइट्सवर आपला निकाल पाहता येईल-  jeeadv.ac.in je&erdved.aced.in,  cbseresults.nic.in किंवा results.nic.in
– होमपेजवर गेल्यानंतर जेईई परीक्षेची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर तुम्ही थेट निकालाच्या पानावर जाल.
– त्यानंतर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर/ रोल नंबर, नाव आणि जन्म दिनांक नमूद करा आणि सबमिटवर क्लिक करा.
– यानंतर तुमच्या मोबाइल किंवा कंप्युटर स्क्रीनवर निकाल दिसू लागेल.
– निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट देखील घेऊन ठेवा. भविष्यात उपयोगी पडेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button