ताज्या घडामोडीराष्ट्रिय

गुटखा व्यापाऱ्याच्या घरावर धाड; तब्बल १८ तास सुरू होती छापेमारी

उत्तर प्रदेश| हरीमपुरमध्ये केंद्रीय वस्तू सेवा कर विभागाने एका गुटखा व्यापाऱ्याच्या घरी धाड टाकली होती. या छापेमारीत प्रशासनाच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. विशेष, म्हणजे व्यापाऱ्याने सर्व पैसे एका बेड बॉक्समध्ये लपवून ठेवण्यात आले आहेत.

या छापेमारीत केंद्रीय वस्तू सेवा कर विभागाने या गुटखा व्यापाऱ्याच्या घरी धाड टाकून ६ कोटी ३१ लाख ८०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. जवळपास १८ तास ही कारवाई सुरू होती. सेवा कर विभागाने रोकड जप्त केल्यानंतर स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मोजण्याच्या तीन मशिन व मोठे ट्रंक घेऊन आले असल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही कारवाई होत असताना पोलीस उपायुक्तांनी याबाबत अधिक माहिती देणे टाळले. सह आयुक्तांनी सर्च वॉरंट जारी केलं होतं त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सुमेरपुर कसबे ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गुटखा व्यापारी जगत गुप्ता यांच्या घरी केंद्रीय वस्तू सेवा कर विभागाने धाड टाकली होती. जवळपास १५ लोकांची टीमकडून ही कारवाई सुरू होती. १२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता कारवाई सुरू झाली ती १३ एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत छापेमारी सुरू होती. धाडसत्र संपताच बँक कर्मचाऱ्यांनी जप्त करण्यात आलेली रोकड ठेवण्यासाठी तीन मोठे ट्रंक घेऊन पोहोचले होते. तीन मोठ्या ट्रंकमध्ये रोकड भरून स्टेट बँके हरीमपुर येथे पाठवण्यात आले आहेत. गुटखा व्यापाऱ्याने जीएसटीमध्ये फेरफार केल्याचा संशय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button