ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात युती झाली तर ठीक, अन्यथा मनसेचा 1 ला चलो रे…..!

पुणे | आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेची युती झाली तर ठीकच अन्यथा आमची ‘1 ला चलो रे’ ची भूमिका कायम आहे, अशी माहिती पुणे शहर मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे वारंवार भेट घेत असल्याने युतीच्या दिशेने ही वाटचाल असल्याची राजकीय कुजबुज सुरू आहे. सध्या राज यांनी पुण्यात मुक्कामच ठोकला आहे. दिनांक 12, 13 आणि 14 ऑगस्टला राज पुन्हा पुण्यात आढावा घेणार आहेत.

2012 – 2017 मध्ये 19 नगरसेवक 5 – 5 हजार मातांनी पराभूत झाले होते. या जागी भाजप नगरसेवक निवडून येऊन त्यांना ड्रेनेज, पाईपलाईन, रस्ते या व्यतिरिक्त कोणते काम करता आले? असा सवालही मोरे यांनी उपस्थित केला. आगामी पुणे शहराचा महापौर मनसे ठरविणार आहे. शहारात काँग्रेस आणि राष्ट्रीवादीची ताकद कमी झाली आहे. मनसे आणि भाजप युतीची जोरदार चर्चा आहे. आपली युती होणार असे म्हणून कार्यकर्तेही खुश आहेत. भाजपला आता युतीशिवाय पर्याय नाही.

2009 ला मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यातील ‘गोल्डन मॅन आमदार’ म्हणून ओळखले जाणाऱ्या रमेश वांजळे यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोट निवडणुकीत वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणि भाजपचे आमदार भीमराव तापकीर विजयी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button