breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडी

रुग्णालयात व्हेंटिलेटर असता तर…; तारकर्ली दुर्घटनेवर निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना झाली. या परिसरात स्कुबा डायव्हिंग करून परतणारी बोट बुडाल्याने दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. तसंच सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उर्वरित १९ पर्यटकांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलं. या दुर्घटनेनंतर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश राणे यांनी एक ट्वीट करत आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढले. ‘मालवण, तारकर्ली, देवबाग ही नावं आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर असताना मालवण ग्रामीण रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर नाही. आज २ पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तरी दोघांचे प्राण वाचले असते,’ असं राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसंच एकाला खासगी रुग्णालयात हलवल्याने त्याचा जीव वाचला, असंही ते म्हणाले.

समुद्रात अचानक काय घडलं?

तारकर्ली समुद्रात मंगळवारी ‘जय गजानन’ नावाच्या बोटीमध्ये सहा लहान मुलांसह २८ पर्यटक होते. तारकर्लीजवळ समुद्रात स्कुबा डायव्हिंग करून माघारी येत असताना किनाऱ्यापासून काही अंतरावर ही बोट लाटांच्या तडाख्याने बुडाली. दुर्घटनेनंतर स्कुबा व्यावसायिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केल्याने अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आकाश भास्करराव देशमुख (३०, रा. शास्त्रीनगर, अकोला) आणि डॉ. स्वप्नील मारुती पिसे (४१, रा. आळेफाटा, पुणे) अशी आहेत.

रश्मी निलेश कासुल (४५, रा. ऐरोली, नवी मुंबई) यांच्यावर रेडकर रुग्णालयात, तर संतोष यशवंतराव (३८, रा. बोरिवली, मुंबई) यांच्यावर डॉ. अविनाश झांट्ये रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मृणाल मनीष यशवंतराव (८), ग्रंथ मनीष यशवंतराव (दीड वर्षे), वियोम संतोष यशवंतवराव (साडेचार वर्षे, सर्व रा. बोरिवली, मुंबई), वैभव रामचंद्र सावंत (४०, रा. वायरी, तारकर्ली), उदय भावे (४०, रा. ऐरोली, नवी मुंबई) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलेले अन्य १९ पर्यटक मुंबई, कुडाळ, कोल्हापूर, पुणे व नवी मुंबई येथील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button