breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडी

इडली विकून दिला स्वप्नांना आकार, तरुणाची राज्य राखीव पोलिस दलात निवड

मनमाड : प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत घर चालवणाऱ्या आई-वडिलांना साथ देण्यासाठी धावत्या रेल्वेत इडली विकणाऱ्या मनमाडच्या उमेश उगलमुगले या तरुणाची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्य राखीव पोलिस दलात निवड झाली आहे.

पहाटे साडे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत धावत्या रेल्वेत इडली विकायची आणि नंतर ८ ते १० तास महात्मा फुले अभ्यासिकेत जीवतोड अभ्यास करायचा या जिगरबाजपणामुळे उमेशचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक परदेशी यांनीही त्याला या प्रवासात मोलाचे मार्गदर्शन केले. उमेश हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा आहे. राज्यशास्त्र विषयात त्याने पदवी पूर्ण केली आहे. त्याचे वडील हॉटेल कामगार तर आई मोलमजुरी करून चार पैसे जोडून संसाराला मदत करते. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत उमेशने रेल्वेत इडली विकून कुटुंबाला हातभार लावला. मात्र पोलिस बनण्याचे त्याचे स्वप्न तो कधी विसरला नाही. नगर पालिका इमारतीतील महात्मा फुले अभ्यासिकेत सलग चार वर्षांपासून उमेशने नियमित अभ्यास केला. तेथील दर्जेदार पुस्तकांचाही त्याला लाभ झाला. गांगुर्डे सरांनी स्पर्धा परीक्षेची करून घेतलेली तयारी महत्त्वपूर्ण ठरल्याचे उमेश सांगतो.

इच्छेला कष्ट आणि प्रयत्नांची साथ लाभली की असाध्य ते साध्य होते. इडली विकणारा मुलगा स्पर्धा परीक्षेतून पोलिस दलात जाऊ शकतो यात पाठीशी असणाऱ्यांचा मोठा वाटा आहे.

-उमेश उगलमुगले, मनमाड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button