ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

दोन दिवसांपूर्वी नातेवाईकांकडे गेला अन् घडलं भयंकर, तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला?

परभणी | दोन दिवसांपूर्वी नातेवाईकाकडे आलेल्या एका २७ वर्षीय युवकाचा मृतदेह बसस्थानकावरील प्रवासी निवार्‍यामध्ये आढळल्याची खळबळजनक घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी बस स्थानकावर घडली आहे. अमोल गोपीचंद खरात असे मयत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे बोरी गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकी घटना कशामुळे घडली?…

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गोपीचंद खरात (वय २७ वर्षे रा.सरकटे वझर ता.मंठा) जिंतूर तालुक्यातील बोरी येथील नामदेव नगरातील आपल्या नातेवाईकांकडे दोन दिवसांपूर्वी आला होता. बुधवारी २७ सकाळी बोरी येथील प्रवासी निवार्‍यामध्ये त्याचा मृतदेह तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत आढळला. तेव्हा बसस्थानक परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. अचानक झालेल्या घटनेमुळे नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

आकस्मात मृत्यूची नोंद…

शिवाजी गोपीचंद खरात यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलिसात ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत मुळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, बोरी बीट जमादार के.जी.पतंगे यांनी भेट देऊन पंचनामा केला. बोरी प्रवाशी निवार्‍यामध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान, दुचाकीसमोर अचानक मुंगूस आल्यामुळे युवकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली दुचाकी दुभाजकावर आदळून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना परभणी तालुक्यातील दैठणा येथे घडली आहे. कांचन भीमराव घोबाळे असे अपघातामध्ये मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button