breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास मी नकार दिला होता- देवेंद्र फडणवीस

मुंबई |

सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदत घेतली. “सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास मी नकार दिला होता. सचिन वाझेचा रेकॉर्ड फारसा चांगला नव्हता. असं यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलेलं आहे.

फडणवीस म्हणाले, “आपल्या सर्वांना माहिती आहे की, जी घटना मुंबईत घडली. उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरासमोर ज्याप्रकारे जिलेटीन कांड्याने भरलेली एक स्कॉर्पिओ आढळून आली व त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या सर्वांसमोर आहेत. त्यानंतरच्या घटनांमधील सर्वात मोठी कडी मनसुख हिरेन यांचा ज्या प्रकारे खून केला जातो. या सर्व गोष्टी मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासात या अगोदर कधीच घडल्या नाहीत. आम्ही ९० च्या दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरणाचा महराष्ट्रात अनुभव घेतला होता. तशाचप्रकारची परिस्थिती आणि आता तर संरक्षण करणारेच अशाप्रकारे गुन्हे करत असतील, तर मग संरक्षण कोण करणार हा प्रश्न आहे. ”

वाचा- आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आमदार लांडगे ‘ऑनफिल्ड’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button