पिंपरी / चिंचवड

विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

घरातील किरकोळ कारणांवरून तसेच विवाहितेवर संशय घेऊन पतीने तिचा छळ केला. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 फेब्रुवारी 2014 ते ऑक्‍टोबर 2020 या कालावधीमध्ये इचलकरंजी येथे घडली.

नितीन उद्धन भाट (वय 32, रा. इचलकरंजी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने रविवारी (दि 15) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासून आरोपी पती नितीन हा फिर्यादी यांना शेजाऱ्यांशी बोलून देत नव्हता. तसेच तो फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करत असे. कपडे इस्त्री केले नाही, कुठे कचरा दिसल्यास, जेवण कितीही व्यवस्थित केले तरी त्याला नावे ठेवणार, जेवण फेकून देणार या कारणावरून पती फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण करत असे. माहेरच्या लोकांसोबत देखील आरोपी नितीन याने फिर्यादी विवाहितेला बोलण्यास मनाई केली होती. मुले न जेवता झोपली तरी देखील फिर्यादी यांना तो झाडूने मारहाण करत असे, भररस्त्यात देखील आरोपीने विवाहितेला मारहाण करत वेळोवेळी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button