ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
महापुरुषांच्या अवमान विरोधात सोलापूरमध्ये विशाल मोर्चा
सोलापूर : महापुरूषांच्या अवमान विरोधात सोलापूरमध्ये विशाल मोर्चा काढण्यात आला असून, बंद घोषीत केला आहे. या बंदला सर्वपक्षीय पाठिंबा मिळालेला पहायला मिळत आहे.
भाजपाच्या नेत्यांनी महामानवांचा अवमान केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सोलापूरमधील मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत.