breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

भाजप किती जागा जिंकणार? अमेरिकेच्या राजकीय तज्ज्ञाने केली मोठी भविष्यवाणी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता आणखी दोन टप्प्यातील मतदान बाकी असून ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. भाजपच्या नेतृत्वात एनडीए तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने ही निवडणूक लढवली आहे. दोन्ही बाजुने आपलंच सरकार स्थापन होणार असा दावा केला जात आहे. त्यातच आता अमेरिकेतील एका प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञाने मोठा दावा केला आहे. इयान ब्रेमर यांनी एका मुलाखतीत सांगितले की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 305 (+/- 10) जागा मिळू शकतात. ब्रेमर हे युरेशिया ग्रुपचे संस्थापक आहेत. जगभरातील निवडणुकांवर त्यांचे बारीक लक्ष असते. ब्रेमर म्हणाले की, जागतिक राजकीय दृष्टीकोनातून भारताच्या लोकसभा निवडणुका ही एकमेव गोष्ट आहे जी स्थिर आणि सातत्यपूर्ण दिसते.

हेही वाचा – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर स्वाती मालीवाल यांच्या मुद्द्यावर सोडले मौन

भारतात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांबाबत विचारले असता ब्रेमर म्हणाले की, युरेशिया ग्रुपच्या संशोधनावरून भाजप 295-315 जागा जिंकेल. पंतप्रधान मोदी यांनी सलग दोन वेळा निवडणुका जिंकल्या आहेत. 2014 मध्ये भाजपला 282 जागा मिळाल्य़ा होत्या तर 2019 मध्ये 303 जागा मिळाल्या होत्या. आता ब्रेमर यांनी देखील सांगितले की त्यांना संख्यांमध्ये रस नाही. ब्रेमर म्हणाले की, “मला जगातील सर्व निवडणुकांमध्ये स्वारस्य आहे. पण मजबूत आर्थिक कामगिरी आणि सततच्या सुधारणांमुळे मोदी तिसऱ्यांदा नक्कीच विजयी होणार आहेत. हा एक अतिशय स्थिर संदेश आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देखील दावा केला होता की, केंद्रातील सध्याच्या मोदी सरकारबद्दल कोणताही विशेष असंतोष दिसत नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पर्याय असावा अशी कोणतीही जोरदार मागणी नव्हती. प्रशांत किशोर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आणखी एक विजय मिळवून देऊ शकतात. भाजपच्या जागांची संख्या 2019 च्या जवळपास किंवा त्याहूनही जास्त असू शकते. 2019 मध्ये भाजपने एकूण 303 जागा जिंकल्या होत्या. ते म्हणाले की, “मोदींच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करेल. गेल्या निवडणुकीप्रमाणेच त्यांना किंवा त्याहून किंचित जास्त जागा भाजपला मिळू शकतात.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button