ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

दिवाळी वंचितांची… सामाजिक जाणीवांची..! : निराधारांची दिवाळी केली गोड!

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विधायक उपक्रम

पिंपरी : देशभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आणि वंचित घटकांचीही दिवाळी गोड व्हावी. या करिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने ‘‘दिवाळी वंचितांची… सामाजिक जाणीवांची..!’’ असा विधायक उपक्रम शहरभरात राबवण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे, कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाचे शहरातील सामाजिक संस्थांकडून कौतूक होत आहे.

शहराध्यक्ष शेखर काटे म्हणाले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवडच्या पुढाकाराने यावर्षी दिवाळी वंचित घटकांसोबत साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला. या माध्यमातून रस्त्यावर, वस्त्यांवर बेघर असलेल्या आणि निराधार नागकिरांना आणि परिस्थितीमुळे संघर्षमय जीवन जगणाऱ्या लहान मुलांसोबत आम्ही दिवाळी सण साजरा केला. प्रवाहापासून दूर असलेल्या लोकांच्या जीवनात क्षणभर जरी आनंदाचा प्रकाश आपण निर्माण करु शकलो, तर जीवन सार्थ ठरले, अशी भावना आहे.

पिंपरी-चिंचवडमधील निगडी, पिंपरी, कासारवाडी, डांगे चौक, निगडी, भोसरी आदी विविध ठिकाणी युवक राष्ट्रवादीतर्फे हा उपक्रम दिपावलीच्या निमित्ताने राबवण्यात आला. वंचित घटकांची दिवाळी गोड करण्याचा छोटा प्रयत्न निश्चितच दिवाळी विधायकपद्धतीने साजरा केल्याचे समधान देणारा आहे. समाजातील वंचित घटकांच्या सुख-दु:खात राष्ट्रवादी युवक कायम सहभागी असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा विश्वास आहे, असेही शेखर काटे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button