breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पुन्हा ‘हनीट्रॅप’; महिलेसह दोघांना अटक

  • जिल्ह्यत अनेक टोळ्या कार्यरत असण्याची शक्यता

नगर |

बहुचर्चित ‘हनीट्रॅप‘चे आणखी एक प्रकरण उघडकीला आले आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध एमआयडीसी पोलीस घेत आहेत. अटक केलेल्या दोघांना उद्या, मंगळवारी न्यायालयापुढे हजर केले जाईल. यापूर्वी नगर तालुक्यासह अकोले, संगमनेरमध्ये ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून लाखो रुपयांच्या फसवणुकीच्या घटना उघडकीला आल्या आहेत. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल होऊ लागल्याने ‘हनीट्रॅप’मध्ये फसवणुकीला बळी पडलेले तक्रार देण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे लवकरच आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

नव्याने उघडकीला आलेल्या घटनेत पाथर्डी तालुक्यातील एका बागायतदाराने एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भादंवि ३९४, ३८४, १२० (ब), ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी शीतल खर्डे (रा. वडगाव गुप्ता, नगर) व गणेश छगन गिर्हे (रा. राघोहिवरे, पाथर्डी) या दोघांना अटक केली आहे. तिसरा आरोपी फरार आहे. वडगाव गुप्ता भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेने गणेश गिर्हे याच्या मध्यस्थीने पाथर्डीतील बागायतदार व रंगकामाचे ठेका घेणाऱ्याशी मैत्री केली, त्याच्यासोबत छायाचित्रे काढली. नंतर पुन्हा संपर्क करुन त्याला रंगकामाचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याला दि. १५ जूनला वडगाव गुप्ता येथे बोलावून घेतले.

बागायतदार वडगाव गुप्ता येथे आला असता त्याला महिलेने घरी नेले. तेथे अचानक पती किरण खर्डे आला, असे भासवून पत्नीबरोबर घरात एकत्र असल्याचा बनाव करीत बागायतदाराला मारहाण केली व त्याच्या खिशातील रोख ५ हजार रुपये काढून घेतले. पुन्हा काही दिवसांनी गणेश गिर्हे याच्या मध्यस्थीने बागायतदाराशी संपर्क करून प्रकरण मिटवण्यासाठी प्रत्येकी दोन लाखाचे तीन धनादेश त्याच्याकडून लिहून घेतले. त्यातील एक धनादेश बँकेतून वटवला. त्यानंतर या बागायतदाराने एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करत आहेत.

  • धनादेशाद्वारे उकळली खंडणी

यापूर्वी आढळलेल्या ‘हनीट्रॅप’च्या प्रकरणात लाखो रुपये उकळून कोटीची खंडणी मागितल्याच्या घटना उघडकीस आल्या. वडगाव गुप्ता भागातील प्रकरणात मात्र बागायतदाराकडून धनादेश घेऊन पैसे उकळले गेले आहे. हनीट्रॅपच्या माध्यमातून महिलांसह टोळ्या फसवणुकीसाठी वेगवेगळे प्रकार अवलंबत असल्याचे आढळत आहे. आतापर्यंत नगर तालुक्यासह अकोले संगमनेरमधील घटनात वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत असल्याचे आढळले. त्यामुळे हनीट्रॅप प्रकरणात अनेक टोळ्या कार्यरत असल्याची शक्यता व्यक्ती केली जाते.

  • दुसरा आरोपी कोण? तपासला वेगळे वळण

वडगाव गुप्ता भागातील हनीट्रॅप प्रकरणाला पोलीस तपासात वेगळे वळणही मिळाले आहे. अटक केलेल्या शीतल हिने तिसरा आरोपी किरण खर्डे हा पती असल्याचा बनाव केला होता. तोही या प्रकरणात आरोपी आहे. मात्र प्रत्यक्षात शीतलचा सन २०१८ मध्येच घटस्फोट झाल्याचे पोलीस तपासात आढळले. त्यामुळे हा तिसरा आरोपी कोण, असा प्रश्न पोलीस तपासात पुढे आला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. शीतल खर्डेला लोणी (राहता) गावात गिर्हे याच्यासह अटक करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button