breaking-newsताज्या घडामोडीपुणे
आंबेगावातील शेतात मृतावस्थेत आढळला बिबट्या
पुणे महाईन्यूज
आंबेगावमध्ये एका शेतात बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून बिबट्याच्या मानेला अनेक जखमा झाल्या आहेत. त्यामुळे 2 बिबट्यांच्या भांडणातून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
दरम्यान, घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी पोहचले असून त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. तसेच बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला. याबाबत ते शोध घेणार आहेत.