breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार’; शिंदे गटातील नेत्याचं मोठं विधान

Uddhav Thackeray and Narendra Modi | लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यातच उद्धव ठाकरे हे भाजपासोबत जाणार असल्याचा मोठा दावा शिंदे गटातील आमदाराने केला आहे. एक हजार टक्के उद्धव ठाकरे भाजपासह जातील आणि लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील, असं आमदार शाहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.

शाहाजी बापू पाटील म्हणाले की, एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो. आपला अंदाज चुकणार नाही. दिवस कुठला ते बघावं लागेल. पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही. पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागण्याचा दिवस येणार आहे.

हेही वाचा    –      Pune | कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या अखेर जेरबंद 

राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण आहे. अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनाही वाटलं की आपणही भाजपासह जावं तर त्यात गैर काही नाही. महायुतीला लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळतील असा दावाही शाहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button