breaking-newsपुणे

चाकणला १७ लाखांचा गुटखा पकडला

चाकण –  संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी सयुंक्तपणे कारवाई करून रविवारी पहाटे पाचच्या सुमारास पकडला. यात १७ लाख ३१ हजार ८४० रुपये किमतीचा ४१ पोती गुटखा पकडला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व अन्न भेसळ सुरक्षारक्षक महेंद्र पाटील यांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोचा चालक व क्लीनर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून टेम्पोसह २५ लाख ३१ हजार ८४० किमतीचा ऐवज जप्त केला आहे. चाकण परिसरातील ही दुस-यांदा झालेली मोठी कारवाई आहे. त्यामुळे राज्यातील गुटखाबंदीला हरताळ फासल्याचे चित्र दिसत आहे. छुप्या पद्धतीने गुटखाविक्री जिल्ह्यात होत असल्याची माहिती प्रशासना गुप्त खब-याकडून रविवारी पहाटे मुंबई येथून एक टेम्पो शिक्रापूर येथे गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती रात्रीच्या वेळी गस्त घालणा-या पथकाला मिळाली.

त्यानुसार येथील तळेगाव चौकात गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी शिताफीने पकडला. या टेम्पोतून वाहतूक करण्यात आलेला १७ लाख ३१ हजार ८४० रुपयांचा गुटखा व ८ लाख रुपयांचे वाहने असा सुमारे २५ लाख ३१ हजार ८४० रुपयांचा ऐवज चाकण पोलीस अन्न व औषध प्रशासनान यांच्या संयुक्तपणे झालेल्या कारवाईत जप्त केला. टेम्पोचालक बिपीन वैचन गिरी व क्लीनर मुकेश काशी गिरी यांना ताब्यात घेतले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेखर कुलकर्णी, अजय भापकर, संजय सूळ, नवनाथ खेडकर, होमगार्ड वैजनाथ पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button