Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

कॅन्सर कधीच होणार नाही? त्यासाठी काय खावे? अमेरिकन डॉक्टरांनी सांगितला कर्करोग-प्रतिबंधक आहार

#न्यूयॉर्क: सध्या तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असल्या तरी, ‘आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये’ यावर वैद्यकीय तज्ज्ञ आता अधिक भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रसिद्ध नॅचरल मेडिसिन तज्ज्ञ आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. जॉय ॲक्स यांनी दिलेला एक सल्ला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. “मला भविष्यात कर्करोग होऊ नये, यासाठी मी आत्तापासूनच जणू मला तो झाला आहे अशा शिस्तीने आहार घेतो,” असे विधान त्यांनी केले आहे.

निरोगी राहण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शरीराच्या प्रतिसादाची वाट न पाहता आधीच सावध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. डॉ. ॲक्स यांच्या मते, रक्तातील साखरेचे नियंत्रण, शरीरातील सूज कमी करणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणे यावर आधारित आहार कर्करोगाला दूर ठेवू शकतो.

हेही वाचा –  Raja Shivaji Movie : शिवाजी महाराजांच्या भावविश्वाचा वेध

कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे?

  • रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा

रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी जेवणात प्रथिनांचा समावेश असावा. साखर आणि प्रक्रिया केलेल्या कर्बोदकांचे प्रमाण कमी करून आहारात फायबर आणि चांगल्या मेदाचा समावेश करावा.

२. तंतुमय पदार्थांचे सेवन करा

आतड्यांच्या आरोग्यासाठी फायबर अत्यंत आवश्यक आहे. दिवसाला किमान ३० ते ४५ ग्रॅम फायबर पोटात जाणे गरजेचे आहे. यासाठी पालेभाज्या, कडधान्ये आणि फळांचा आहारात समावेश करावा.

३. विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे खा

आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘इंद्रधनुषी’ आहार घ्यावा. म्हणजेच विविध रंगांची फळे, भाज्या आणि औषधी वनस्पतींचे सेवन करावे.

४. क्रूसिफेरस भाज्यांवर भर द्या

फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली आणि केल यांसारख्या भाज्यांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

५. प्रक्रिया केलेले अन्न टाळा

वेफर्स, शीतपेये आणि पॅकबंद पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात. त्याऐवजी नैसर्गिक आणि साध्या पदार्थांना प्राधान्य द्यावे.

६. महत्त्वाची पोषक तत्वे

शरीराला व्हिटॅमिन-डी, झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन-सी आणि ई यांसारख्या पोषक घटकांची अत्यंत गरज असते.

७. हेल्दी फॅट्सचा वापर

ओमेगा-३ युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. यासाठी मासे, ऑलिव्ह ऑईल, बदाम आणि अक्रोड यांसारख्या सुक्या मेव्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.

८. आतड्यांचे आरोग्य महत्वाचे

आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आंबवलेले पदार्थ आणि फायबरयुक्त अन्न खावे.

९. मशरूम्स खा

आहारात औषधी गुणधर्म असलेल्या मशरूम्सचा (उदा. रिशी मशरूम) समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

प्रतिबंधात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा

पाश्चात्य वैद्यकीय पद्धतीत सहसा लक्षणे दिसू लागल्यावर उपचार केले जातात. मात्र, डॉ. ॲक्स यांच्या मते, आजची आपली आहारशैली आणि जीवनशैली भविष्यातील गंभीर आजार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आरोग्याकडे पाहण्याचा हा ‘प्रोअॅक्टिव्ह’ म्हणजेच प्रतिबंधात्मक दृष्टिकोनच आपल्याला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकतो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button