Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

लहान बाळाला चांदीचे दागिने का घालतात? वाचा सविस्तर…

Baby Silver Jewellery | लहान बाळाला हातात, पायात चांदीचे दागिने घातले जातात. आपल्या देशात धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या लहान बाळांना दागिने घालणे सामान्य बाब आहे. बाळांना अनेक प्रकारचे दागिने घालण्याची प्रथा हाताला कडे आणि पायात पायघोळ, गळ्यात साखळी घालण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. मुख्यतः मुलांना हातात चांदीचे कडे आणि पायात पैंजन घालण्याची प्रथा आहे. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत, लहान मुलांसाठी चांदीचे अलंकार घालणे का फायदेशीर आहे.

मुलांचा मानसिक विकास होतो : चांदीचे दागिने घातल्याने मुलांच्या मानसिक विकासात कोणतीही कमतरता येत नाही. लहान मुलाला चांदीचे दागिने घातल्याने त्यांचा मानसिक विकास चांगला होतो आणि त्याचा त्यांच्या मनावरही सकारात्मक परिणाम होतो. यामुळे लहान मुलांना चांदीच्या बांगड्या आणि पैंजण घातले जातात.

हेही वाचा     –      २६ जानेवारीला प्रभावी भाषण करायचं असल्यास या टिप्स फॉलो करा!

चांदीमुळे मुलांच्या अंगातली उर्जा बाहेर जात नाही : ज्योतिषशास्त्रानुसार, लहान मुलांनी पायात पैंजण, गळ्यात माळ, हातात चांदीच्या बांगड्या घालणे अत्यंत चांगले मानले जाते. चांदी हा चंद्राचा धातू मानला जातो. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चांदी हा एक प्रतिक्रियाशील धातू आहे आणि चांदी शरीरातून सोडलेली ऊर्जा शरीरात परत करत असते.

रोगांशी लढण्याची क्षमता : चांदीला जंतूनाशक धातू मानले जाते. चांदीमुळे लहान मुलांची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते असे मानले जाते. लहान मुलांना चांदीचे दागिने घातल्याने जंतू आणि रोग कमी होतात आणि मुले निरोगी राहतात.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button