Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
चिकन खाणाऱ्यांसाठी WHOचा सतर्कतेचा इशारा! ‘या’ आजाराला पडाल बळी

WHO : भारतात चिकन खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र चिकन प्रेमींना थोडे सावध करणारे वृत्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अती चिकन खाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा – पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अमोल मिटकरींचं मोठं विधान

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओच्या मते, चिकन खाणारे लोक अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सला (AMR) बळी पडत आहे. यामुळे प्रतिजैविक, अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासायटिक औषधांचा प्रभाव कमी होतो. अशा परिस्थितीत गंभीर आजारांवर उपचार करणे कठीण होते. AMR हा सर्वात मोठ्या रोगांपैकी एक असल्याचे सांगितले आहे.





