आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय

उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालय 5 तासांपासून अंधारात

रुग्णांवर मेणबत्तीवर उपचार सुरु

उल्हासनगर : जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालय हे गेल्या 5 तासांपासून अंधारात आहे. एकीकडे महावितरणने घेतलेले शट डाऊन आणि त्यात रुग्णालयामधील जनरेटरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने रुग्णांवर मेणबत्तीवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे.

शुक्रवारी महावितरण कडून शट डाऊन घेतला जातो.त्यामुळे यापूर्वी देखील रुग्णालय अंधारात गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशावेळी रुग्णालयातील जनरेटरच्या दुरुस्तीचे देखील काम निघाल्याने उजेडातील रुग्णालयाचे रूपांतर अंधारात झाले होते.

चार महिन्यांपूर्वी देखील रुग्णालयात तब्बल दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाला होता.तेंव्हा सुद्धा रुग्णांचे असेच हाल झाले होते. वारंवार जिल्हा रुग्णालयात वीज जात असल्याने त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्याशी पत्रकारांनी विचारणा केली असता,शट डाऊन आणि काही जनरेटरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने रुग्णालयातील ठराविक भाग हा अंधारात होता.

मात्र महत्वाच्या वार्डात मोजके जनरेटर असल्याने त्याठिकाणी उजेडात कामकाज झाले. इमर्जन्सी ऑपरेशनची वेळ आल्यास रुग्णाला कॅम्प नंबर 4 मधील शासकीय रुग्णालयात नेऊन ऑपरेशन करण्याची तयारी ठेवण्यात आल्याची माहिती डॉ. बनसोडे यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button