आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी चपाती आरोग्यासाठी उपयुक्त

शिळी चपाती खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते प्रोटीन मिळतं

महाराष्ट्र : रात्री केलेल्या जेवणातील काहीना काही पदार्थ हे शिल्लक राहतातच. जसं की भाज, भाजी आणि चपात्या तर हमखास शिल्लक राहतात. एक वेळ भात शिल्लक राहिला की शक्यतो आपण दुसऱ्या दिवशी सकाळी फोडणीचा भात वैगरे करून खातो.

पण चपाती शिल्लक राहिल्यावर शिळी खायला नको म्हणून आपण ती शक्यतो फेकून देतो. काहीजणांचं असं म्हणणं असत की, शिळी चपाती खाल्ल्यानं पोटात दुखतं असं म्हणतात. पण शिळी चपाती फेकून देण्याऐवजी खाल्ल्याचे फायदे समजले तर तुम्हीही थक्क व्हाल. शिळी चपाती खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते प्रोटीन मिळतं.

तसेच चपातीमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीराला ऊर्जा मिळते. रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला शिळी चपाती खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात हे समजल्यावर तुम्हीही यापुढे चपाती फेकून देताना नक्की विचार कराल.

शिळी चपाती खाल्ल्याने होणारे फायदे

मधुमेहासाठी गुणकारी शिळी चपाती खाणे मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असतं. मधुमेह असलेल्या रुग्णांनी शिळ्या चपात्यांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.सकाळी उठल्यानंतर नाश्ता करताना शिळ्या चपात्या दुधात कुस्करून खाल्ल्यास आरोग्याला फायदे होतात. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवतात. अशावेळी तुम्ही शिळ्या चपात्या खाऊ शकता. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी सकाळी उठल्यानंतर कोमट दुधातून चपाती खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. दुधामध्ये अर्धा तास आधी चपाती भिजत घालून ठेवावी. त्यानंतर चपातीचे सेवन करावे. त्याने अनेक फायदे मिळतात.

पोटाचे विकार दूर होतात गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी चपाती आरोग्यासाठी उपयुक्त आहे. चपातीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने असिडिटी किंवा इतर समस्या जाणवत नाहीत. पोटासंबंधित कोणत्याही समस्या जाणवू लागल्यास रोज रात्री कोमट दुधात एक चपाती भिजत घालून 15 मिनिटं ठेवा. त्यानंतर चपातीचे सेवन करावे. यामुळे अॅसिडिटी होत नाही किंवा झालेली अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते शिळ्या चपातीत फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. शिळी चपाती खाल्ल्यानं बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटत आणि खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. गॅसची समस्या उद्भवत नाही. शिळी चपाती खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते

शिळ्या चपातीत व्हिटामीन्स, मिनरल्स असतात. ज्यामुळे दातं आणि हाडं मजबूत राहण्यास मदत होते. शिळी चपाती खाण्याआधी फक्त ती गरम करायला विसरू नका. यामुळे चपातीची चव अधिक वाढेल. तुम्ही शिळी चपाती आपल्या आवडत्या भाजीसोबतही खाऊ शकता.किंवा डाळ, भाजी, दही, लोणचं या पदार्थांसोबत शिळी चपाती खाल्ल्यास अधिक रूचकर लागते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button