breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी
पोटाच्या समस्येसाठी भोपळा फायदेशीर, वाचा खास रेसिपी..
पोटाच्या समस्येसाठी भोपळा फायदेशीर आहे. तसेच भोपळ्यात फायबर जास्त असल्याने पोट चांगले साफ होते. भोपळ्याची भाजी करून किंवा कोशिंबीर करून खाल्ली की पचनासाठी भोपळा चांगला आहे, हे आपल्याला समजतेच. पाहुयात रेसिपी..
भोपळ्याच्या कोशिंबीरीसाठी साहित्य आणि कृती :
- लहान भोपळा – १
- दही – २ कप
- जिरे – ½ टीस्पून
- हिंग – १ चिमूट
- हिरवी मिरची – १
- कोथिंबीर – १ चमचा
- देशी तूप – १ चमचा
- मीठ – चवीनुसार
हेही वाचा – ‘मी ससूमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं’; ललित पाटीलचा गौप्यस्फोट
- भोपळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि नंतर भोपळ्यावरील साली काढून घ्या.
- आता भोपळा किसून घ्या. आता एका भांड्यात पाणी घालून मध्यम आचेवर पाणी गरम करून घ्या.
- पाणी गरम झाल्यावर त्यात किसलेला भोपळा टाकून ७ ते ८ मिनिटे उकळवा. त्यानंतर गॅस बंद करा आणि एका भांड्यात किसलेला भोपळा बाहेर काढा.
- आता एका वाटीमध्ये दही घेऊन चमच्याने चांगले फेटून घ्या.
- यानंतर एका पातेल्यात एक चमचा गावरान तूप टाकून गरम करा. आता तूप वितळल्यावर नंतर त्यात जिरे आणि हिंग घालून तडतडून घ्या.
- काही सेकंद तळल्यानंतर त्यात फेटलेले दही घाला. एक मिनिट दही शिजल्यानंतर त्यात उकडलेल्या भोपळ्याचा कीस घाला.
- मग त्यात हिरवी ताजी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
- एक ते दोन मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा. ही तयार कोशिंबीर तुम्ही पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता.