डासांना दूर लावणाऱ्या या ६ वनस्पती घराभोवती लावा, डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत
![Plant these 6 mosquito repellent plants around the house, mosquitoes won't even visit you](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Mosquitoes-780x470.jpg)
Mosquitoes : मलेरिया, डेग्यू असे अनेक आजार डासांमुळे पसरत असतात. त्यामुळे रोगराई पसरते आणि कधी कधी तर डास एवढे वाढतात की मग त्यांचा काय बंदोबस्त करावा, ते कळत नाही. डासांना पळवून लावण्यासाठी आपण घरात डासांची अगरबत्ती किंवा लिक्विडचा वापर करतो. मात्र, आता डासांना पळवून लावण्यासाठी एक अगदी नॅचरल उपाय करून पाहा आणि झाडं डासांना पळवून लावण्यासाठी उपयुक्त मानली जात असतात. ती झाले तुमच्या घराच्या आसपास लावा.
रोझमेरीचं रोप : डासांना पळवून लाण्यासाठी फायदेशीर ठरतं. तुमच्या घराजवळच्या कोणत्याही नर्सरीमध्ये किंवा ऑनलाईन गार्डनिंग शॉपिंग साईटवर हे रोप मिळू शकते.
पुदिना : पुदिन्याच्या वासानेही डास पळून जात असतात. शिवाय पुदिना तुम्हाला खाण्यासाठीही वापरता येतो आणि त्यामुळे घराभोवती पुदिन्याच्या ३-४ कुंड्या ठेवून द्या. पुदिन्याच्या झाडाची विशेष काळजी घेण्याचीही गरज नसते.
हेही वाचा – उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये बर्न हॉस्पिटलसाठी उभारा!
तुळशी : तुळशीच्या आजुबाजुला कधीही डास फिरकताना दिसत नाहीत कारण तुळशीचा सुवास डासांना दूर ठेवत असतो. त्यामुळे घराभोवती ठिकठिकाणी तुळस लावून ठेवावे.
झेंडु : झेंडुच्या झाडातून येणारा सुवासही डासांना दूर ठेवतो आणि असं म्हणतात की झेंडूची झाडं असतील तर सापदेखील आजुबाजुला फिरकत नाहीत. शिवाय झेंडुची झाडं घराभोवती असतील तर त्या लाल-केशरी फुलांमुळे घराची शोभाही आणखी वाढेल.
गवती चहा : गवती चहा म्हणजे लेमन ग्रासचा उपयोग देखील डासांना दूर ठेवतो आणि शिवाय आरोग्यासाठीही गवती चहा उपयुक्त आहे.
लेमन बाम : लेमन बाम देखील डासांना पळवून लावण्यासाठी उपयुक्त आहे. लेमन बाम ही पुदिन्यासारखी दिसणारी बारमाही येणारी एक औषधी वनस्पती आहे.