आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र
पुणेकरांनो काळजी घ्या! डोळ्याच्या साथीचे रोज ५०० पेक्षा जास्त रूग्ण, अशी घ्या काळजी..
![More than 500 eye disease patients in Pune every day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/eye-patients-780x470.jpg)
पुणे : सध्या राज्यात डोळे येण्याच्या साथीच्या रूग्णांत मोठी वाढ होत आहे. पुणे शहरातही आता डोळ्याच्या साथीचे रोज ५०० पेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत ११ हजारांहून अधिक रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणेकरांनो काळजी घ्या!
पुणे महापालिकेच्या हद्दीत सोमवारी ५७१ रूग्ण आढळले आहेत. शालेय मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे महापालिकेकडून शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाने सोमवारपर्यंत एकूण ११ हजार ७९४ रूग्णांची नोंद केली आहे.
हेही वाचा – Chandrayaan-3च्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक
अशी घ्या काळजी :
- हाताने डोळ्याला स्पर्श करणे टाळा
- एकमेकांच्या वस्तूंचा वापर टाळा
- ओलसर कापडाने डोळे स्वच्छ करा
- डोळे आल्यास कॉन्ट्रॅक्ट लेन्सचा वापर थांबवा
- त्रास अधिक वाढल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या