Chandrayaan-3च्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

पुणे : ‘चांद्रयान-३’ मोहिमेवर संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. हे यान आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटाने चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. दरम्यान, चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक करण्यात आला.
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञाना यश मिळावे यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध, दही विविध फळांचे रस सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला.
हेही वाचा – अमरावतीसह ‘या’ जिल्ह्यांना पुढील २४ तासांकरिता यलो अलर्ट जारी

याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले. मोहीम यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली.
‘चांद्रयान-३’ आज बुधवारी २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार. त्यामुळे संपूर्ण देशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हे सॉफ्ट लँडिंग याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशवासिय उत्सुक आहेत. ‘चांद्रयान-३’ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटाने चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटापासून हे प्रक्षेपण होणार आहे. सॉफ्ट लँडिंगचं थेट प्रसारण इसरोची वेबसाईटवर पाहता येईल. याशिवाय इसरोचं युट्यूब चॅनल, फेसबुक पेजवरही पाहता येईल.
Youtube : https://www.youtube.com/@isroofficial
Facebook : https://www.facebook.com/isro





