आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

चुकीच्या दिशेने झोपल्याने आजाराला आमंत्रित

कोणत्या दिशेने पाय करून झोपणे टाळावे?

मुंबई : चांगली झोप ही आपल्या आरोग्याची एक महत्त्वाची गरज आहे. कारण जर तुमची झोप चांगली असेल तर नक्कीच तुमचे आरोग्य देखील चांगले राहणार. तुमचा दिवस खूप प्रसन्न जाणार. म्हणूनच वडीलधारी लोक अनेकदा चांगल्या आणि योग्य स्थितीत झोपण्याचा सल्ला देतात.

तसेच असेही म्हटले जाते की, कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. असे करणे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारणांसाठीही चुकीचे मानले जाते. पण यामागील नेमका अर्थ काय? दक्षिणेकडे पाय ठेवून का झोपू नये? याचे धार्मिक परिणाम आणि वैज्ञानिक कारणे काय आहेत? त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. तसेच त्याचे आयुष्यावर काही परिणाम होतात का? तेही जाणून घेऊयात.

दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नये याची धार्मिक कारणे काय?

दक्षिण दिशा यमाची आहे असे मानले जाते. म्हणून, या दिशेने पाय ठेवून झोपल्याने त्याचा आयुष्यावर नकारात्मक परिणाम घडू शकतात असं म्हटलं जातं.म्हणून दक्षिणेकडे पाय ठेवून झोपणे चुकीचे मानले जाते.

हेही वाचा :  “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके 

दक्षिणेकडे पाय न ठेवून झोपण्याची वैज्ञानिक कारणे?

रात्री झोपताना आपल्या शरीरात चुंबकीय ऊर्जा निर्माण होत असते असे विज्ञान मानते. यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते. ज्यामुळे शांत झोप येते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, असे मानले जाते की उत्तर आणि दक्षिण ध्रुवांमध्ये चुंबकीय ऊर्जा जास्त असते, जी दक्षिण ध्रुवापासून उत्तरेकडे वाहते. म्हणून, जर कोणी दक्षिणेकडे पाय करून झोपले तर त्याच्या शरीराची चुंबकीय ऊर्जा त्याच्या डोक्याकडे सरकते. त्यामुळे रक्तप्रवाहावर प्रभाव पडू शकतो.

दक्षिणेकडे पाय ठेवून झोपण्याचे शारीरिक परिणाम

डोके उत्तरेकडे किंवा पाय दक्षिणेकडे करून झोपल्याने पायांमधून चुंबकीय ऊर्जा डोक्याकडे वाहते. यामुळे सकाळी उठताना व्यक्तीला ताण येतो, अनेकदा तासन्तास थकवा जाणवतो. डोक्यावर चुंबकीय ऊर्जेचा जास्त परिणाम होत असल्याने, ही ऊर्जा पायांमधून बाहेर पडते, ज्यामुळे त्यांना अधिक ताजेतवाने आणि तणावमुक्त वाटते. म्हणून, दक्षिणेकडे पाय ठेवून झोपणे चुकीचे मानले जाते.

चुकीच्या दिशेने झोपल्याने होऊ शकतात हे आजार

दक्षिणेकडे पाय ठेवून झोपणे म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. विज्ञान असेही सुचवते की उत्तर ध्रुवाच्या चुंबकीय प्रभावामुळे डोकेदुखी, झोपेची समस्या, ताणतणाव आणि सतत चक्कर येणे असे आजार होऊ शकतात. जरी हे गंभीर नसले तरी भविष्यात ते गंभीर धोका किंवा आजार निर्माण करू शकतात. म्हणून, दक्षिणेकडे पाय ठेवून झोपणे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button