Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरच्या विकासात नवा ‘प्रकाश’; कुणाल आयकॉन रोडवर अँटिक पथदिव्यांचा प्रयोग

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह फुटपाथच्या सौंदर्यावर भर

– भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याकडून कामाची पाहणी

पिंपरी-चिंचवड: नव्याने विकसित होत असलेल्या कुणाल आयकॉन रोडवरील फुटपाथला आकर्षक प्रकाशसजावटीचा नवा साज मिळणार आहे. रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना पुरेसा उजेड मिळावा आणि परिसराच्या सौंदर्यात भर पडावी, या उद्देशाने फुटपाथवर अँटिक शैलीतील पथदिवे प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आले आहेत. भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन दिव्यांची रचना, प्रत्यक्ष प्रकाशाचा परिणाम आणि स्थापत्य कामाचा आढावा घेतला.

कुणाल आयकॉन रोडच्या विकासकामांतर्गत फुटपाथवर ‘पोस्ट टॉप डेकोरेटिव्ह फिटिंग’ आणि ‘बरीड लाईट्स’ या दोन प्रकारच्या दिव्यांचा वापर करण्यात आला आहे. ‘पोस्ट टॉप डेकोरेटिव्ह फिटिंग’मध्ये खांबांच्या टोकावर सजावटीचे दिवे बसविण्यात आले आहेत, तर ‘बरीड लाईट्स’ जमिनीच्या पातळीवर बसविण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकारच्या दिव्यांचा एकत्रित वापर करून पादचारी मार्गाला उजेड देण्यासोबतच फुटपाथची रचना उठावदार करण्याचा प्रयत्न आहे.

हेही वाचा –  यशवंतरावांचे विचार आणि अजितदादांचा विकासवारसा पुढे नेणार! : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

प्रत्यक्ष उजेडासह तांत्रिक बाबींची तपासणी

कुणाल आयकॉन रोडवरून रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना या प्रकाशयोजनेचा कसा उपयोग होतो, हे प्रायोगिक टप्प्यात पाहिले जाणार आहे. दिव्यांच्या प्रकाशाचा फुटपाथवर होणारा परिणाम, बसवणीशी संबंधित तांत्रिक बाबी आणि परिसराच्या सौंदर्यात पडणारी भर यांचा आढावा घेतला जाणार आहे. पाहणीदरम्यान काटे यांनी दिव्यांची रचना आणि मांडणी तसेच दिवे बसविण्यासाठी करण्यात आलेल्या स्थापत्य कामाची माहिती घेतली.

प्रयोग यशस्वी ठरल्यास संपूर्ण मार्गासाठी नियोजन

प्रायोगिक प्रकाशयोजनेचा प्रत्यक्ष परिणाम आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. प्रयोग यशस्वी ठरल्यास कुणाल आयकॉन रोडच्या संपूर्ण मार्गावर अशाच प्रकारची प्रकाशयोजना उभारण्यासाठी प्रशासनासोबत नियोजन केले जाणार आहे. या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून नगरसेविका अनिताताई काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे आणि नगरसेवक जयनाथशेठ काटे यांनीही उपक्रमाचे स्वागत केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पिंपळे सौदागरच्या विकासात आधुनिकता आणि सौंदर्य यांचा संगम साधण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. कुणाल आयकॉन रोडवरील नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित, प्रसन्न आणि सुसज्ज वातावरण मिळावे, या उद्देशाने हे अँटिक पथदिवे प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आले आहेत. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहून संपूर्ण परिसरात अशाच दर्जेदार व नावीन्यपूर्ण सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

– शत्रुघ्न (बापू) काटे, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group