निरोगी आयुष्यासाठी नाश्त्यामध्ये करा या 5 फळांचा समावेश!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-78-780x470.jpg)
Include These Fruits In Your Breakfast : नाश्ता हा आपल्या दिवसाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. नाश्त्यामध्ये फळे खाल्ल्याने अनेक फायदे होतात. नाश्त्यात काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल सुद्धा अनेकजण सल्ले देत असतात, माणूस गोंधळून जातो. काही फळे आहेत ज्यांचं सेवन जर नाश्त्यात केलं तर त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. कोणती फळे आहेत ती? चला बघुयात…
वॅक्स पेपरमध्ये लपेटून घ्या: केळी जास्त वेळासाठी ठेवण्यासाठी तुम्ही वॅक्स पेपरने ती केळी गुंडाळून ठेऊ शकता. केळी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी तुम्ही वॅक्स पेपरचा भरपूर वापर करता. याच्या मदतीने तुम्ही केळी गुंडाळू किंवा झाकून ठेवू शकता. अशा वेळी केळी लवकर खराब होणार नाही.
व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट हे सगळं संत्र्यामध्ये असतं. संत्री रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, कॉलेजन उत्पादनास मदत करते. ताज्या संत्र्याचा ज्यूस सकाळी नाश्त्यात घेतल्यास तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगलं आहे हे आपण कायमच ऐकत आलोय. सगळ्या समस्यांवर हे फळ उत्तम उपाय आहे. सफरचंदांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. सफरचंद खाल्ल्याने पचन चांगले होते.
करवंद! करवंद खायला आवडतात का? करवंद म्हणजे काळी मैना जिच्यात जीवनसत्त्वे आणि फायबर असतात. तुम्ही स्मूदी बनवली की त्यात करवंद टाकून खाऊ शकता. करवंदात अँटीऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबर असतात ते एक पॉवरहाऊस आहे. नाश्त्यात खाल्ल्याने बरेच फायदे होतील.
व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के हे महत्त्वाचे घटक किवीमध्ये असतात. किवी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जीवनसत्त्वे आणि मिनरल्स हवे असतील तर सकाळी नाश्त्यात किवी खा.