TOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

मनुक्याचा ‘हा’ प्रकार म्हणजे आरोग्याला वरदान

मनुके आवडत नाहीत असं म्हणणारे फार कमीजण आहेत. काहीसा गोड, काहीसा आंबट असा हा सुक्यामेव्यातील एक प्रकार. गोडाच्या पदार्थांमध्ये वापर करण्यापलीकडेही मनुक्यांचा वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा त्यांचे बरेच फायदे. तुम्हाला माहितीये का, इवलेसे मनुके योग्य पद्धतीनं खाल्ल्यास त्यामुळं गंभीर आजारांपासून दूर राहणंही सहज शक्य होतं. मनुक्यांचा वापर औषधांसाठी केला जातो तुम्हाला माहितीये का? 

मनुका/ मुनक्का नेमका कोणता प्रकार फायद्याचा? 

मनुक्यांचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये बऱ्याच सकारात्मक गोष्टी दडलेल्या आहेत. अनेकजण त्याला मुनक्का (Munakka) असंही म्हणतात. हा मुनक्कासुद्धा द्राक्ष वाळवूनच तयार केला जातो. पण ही द्राक्ष (Dried Grapes) आकारानं मोठी असतात. त्यांचा वापर औषधांमध्येही केला जातो. चवीला ते अतिशय गोड असतात. या मोठ्या मनुकांमुळे पचनक्रिया सुरळीत होते. यामुळं अपचन, गॅस, आम्लपित्ताचा त्रास नाहीसा होतो. 

मनुक्यांचे फायदे एकदा जाणून घ्याच

– मनुक्यांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे रक्तवाहिन्यांचा (Blood cells) तणाव कमी करण्यास यामुळं मदत होते. यामुळं उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो. 
– आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या संशोधनातून मनुक्यांमध्ये असणाऱ्या कॅटेचिन आणि केम्पफेरोलमुळं कॅन्सवर (Cancer) मात करण्यासही त्याची मदत होते. 

– मनुके पॉनीफेनोलिकचा एक उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळं डोळ्यांना आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वं मिळतात. मनुक्यांच्या सेवनामुळे तुम्ही ग्लुकोमा, रातांधळेपणा आणि मोतीबिंदूपासून दूर राहू शकता. 
– शारीरिक बळकटीसाठी मनुक्यांच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

मनुका खाण्याच्या योग्य पद्धती 

– सुदृढ व्यक्तीनं दिवसभरात 5-6  मनुके खावेत. रात्री मनुके पाण्यात भिजत घालून सकाळी त्यांचं सेवन करावं. 
– रात्री अर्धा ग्लास दुधातही मनुके भिजत घालून त्यांचं सेवन करणं फायद्याचं. यामुळं पचनशक्ती सुधारते. 
– मनुके तुम्ही संध्याकाळच्या वेळीही खाऊ शकता. यामुळं हाडं मजबूत होतात. 
– संध्याकाळच्या वेळी खाणं खाण्यापेक्षा म्हणून तुम्ही काळ्या मनुका सकाळी दह्यात भिजवून घालत त्यांचं सेवन संध्याकाळच्या वेळात करु शकता. दह्यामुळं मनुक्यांची पोषक त्तत्वं आणखी वाढतात. याद्वारे पोटही भरतं आणि जीभेचे चोचलेही पुरवले जातात. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button