Breaking-newsआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
GoodNews: Oxford-AstraZeneca च्या कोविड-19 वरील लसीच्या ट्रायल्सला युके मध्ये पुन्हा सुरुवात
मुंबई: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेकाच्या कोविड-19 वरील लसीच्या क्लिनिकल ट्रायलला युके (UK) मध्ये पुन्हा सुरुवात झालेली आहे. लस दिलेली महिला आजारी पडल्याने युके मध्ये या लसीची मानवी चाचणी थांबवण्यात आलेली होती. मात्र आता पुन्हा एकदा लसीच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आलेली आहे. मंगळवार, 8 सप्टेंबर च्या रात्री कंपनीकडून लसीच्या चाचण्या थांबण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली होती. लस दिलेल्या महिलमध्ये काही neurological symptoms दिसून आल्याने लसीच्या चाचण्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली होती.





