breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची करोनावर मात…

नवी दिल्ली |

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी करोनावर मात केली आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स रूग्णालयातून बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. ८८ वर्षीय मनमोहन सिंग यांना करोनाची लागण झाल्यानंतर, १९ एप्रिल रोजी एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांनी करोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले होते. त्यांनी पहिला डोस ४ मार्च रोजी तर दुसरा ३ एप्रिल रोजी देण्यात आला होता.

मात्र करोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांनी रुग्णालयामध्ये दाखल होण्याआधी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये मनमोहन सिंग यांनी करोना परिस्थिती हाताळण्यासंदर्भातील काही सल्ले पंतप्रधानांना दिले होते. त्यात त्यांनी करोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच लसपुरवठय़ास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावीत, अशी सूचनाही केली.

वाचा- #Covid-19: रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारकडून जारी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button