Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्राधिकरणाची जमीन विकून 15 लाख रुपये लाटणा-या भाजप नगरसेवकासह दोघांना अटक

पिंपरी / महाईन्यूज

शासकीय जमिनीची बनावट कागदपत्रे, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत बनवून जागा विकून त्यापोटी 15 लाख 80 हजार रुपये उकळणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. 20 मे 2021 रोजी हा प्रकार उघडकीस आला.

भाजप नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय 42, रा. भोसरी) याच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय 38, रा. भगत वस्ती, हनुमान नगर, भोसरी) याला अटक केली आहे. तर, रविकांत सुरेंद्र ठाकूर (वय 40) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. भुजबळ (वय 37) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेंद्र लांडगे हे भोसरीतील धावडे, भगतवस्ती प्रभागातून भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. स्थायी समितीचे माजी सदस्य तसेच शहर सुधारणा समितीचे माजी सभापती असून सध्या ते ‘क’ प्रभागाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरसेवक लांडगे याने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची इंद्रायणीनगर येथील जागा सर्व्हे नं. 22 मधील 936 चौ. फुट जागा शर्मा आणि ठाकूरला 15 लाख 80 हजार रूपयांना विकली. जागेवर अतिक्रमण करून शर्मा आणि ठाकूरने 1872 चौ. फुट बांधकाम बांधले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मिळकत कर पावती बनवून घेतली. बनावट कागदपत्रे देऊन महावितरणकडून वीज कनेक्शन घेतले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button