Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: कोरोनाच्या लक्षणांकडे कानाडोळा करु नका, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

महाराष्ट्रात आजपर्यंत ५०७ रुग्ण हे करोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. करोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका असंही आवाहन त्यांनी सांगितलं. करोनाची लक्षणं लपवणं अत्यंत चुकीचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.  डॉक्टर, आरोग्य विभागातले कर्मचारी, पोलीस हे सगळे करोनाचा लढा लढवय्यांप्रमाणे देत आहेत. मी त्या सगळ्यांचे आभार मानतो असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र टिकला पाहिजे यासाठी आपण सगळेजण लढतो आहोत असंही त्यांनी सांगितलं. मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ३०० च्या वर गेली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्याला करोनामुक्त व्हायचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button