Breaking-newsआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

#CoronaVirus: अभिमानास्पद! म्हणून अमेरिकेने मानले महिंद्रा समूहाचे आभार

अमेरिकेतील मिशिगनमधील ऑबर्न हिल्स येथील कार प्रकल्पात महिंद्रा समूहाकडून सध्या प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटची निर्मिती सुरु आहे. करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या अमेरिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी या उपकरणांची निर्मिती केली जात आहे. महिंद्राच्या ऑबर्न हिल्स येथील प्रकल्पात अ‍ॅसपिरेशन बॉक्सेस आणि फेस शिल्ड बनवण्याचे काम सुरु आहे.

ऑटो विंडशिल्डसाठी पॉलीकारबोनेटचा वापर होतो. त्याच पॉलीकारबोनेटचा वापर करुन फेस शिल्डची निर्मिती सुरु आहे. डेट्रॉइट न्यूजने मागच्या आठवडयात हे वृत्त दिले. अ‍ॅसपिरेशन बॉक्सेसमुळे Covid-19 च्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना Covid-19 विषाणूची लागण होणार नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी महिंद्राच्या या कार्याची दखल घेतली आहे.

माइक पॉम्पियो यांनी टि्वट करुन या प्रसंगात मदत केल्याबद्दल व आयुष्य वाचवणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीबद्दल महिंद्रा समूहाचे आभार मानले आहेत. महिंद्रा ही भारतातील वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. अमेरिकेतही महिंद्राचा प्रकल्प आहे. सध्य़ा करोनाचे जे संकट निर्माण झाले आहे, त्यामध्ये वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या व्हेंटिलेटर, पीपीई किटची निर्मिती करुन हातभार लावत आहेत. महिंद्र भारतासाठीही स्वस्तातल्या व्हेंटिलेटरची निर्मिती करत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button