सावधान! अँटिबायोटिक्सचा अतिवापर शरीरासाठी ठरू शकतो घातक
![Antibiotics can be harmful to the body if taken in excess](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Antibiotic-Tablets-780x470.jpg)
Antibiotic Tablets : आजारी पडल्यावर रुग्णाला डॉक्टर अँटिबायोटिक्स सारखे औषध देतात. मात्र डॉक्टर ती औषधे जीवाणूंच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी देतात. अँटिबायोटिक्स सर्दी, ताप आणि खोकला यांसारख्या विषाणूजन्य संसर्गांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. ही औषधे शरीरात वाढणाऱ्या बॅक्टेरियाला मारून त्यांची वाढ आणि प्रसार थांबविण्याचं काम करतात. मात्र अँटिबायोटिक्स औषध जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरासाठी घातक ठरू शकतात.
WHO च्या म्हणण्यानुसार कोणाच्याही सल्ल्यानुसार स्वतः अँटीबायोटिक्स घेतल्याने शरीराला नुकसान होते. प्रतिजैविकांच्या प्रतिकारामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अँटीबायोटिक घेताना डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.
हेही वाचा – ‘जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे, पण..’; भाजपा नेत्यांची जरांगे पाटलांवर टीका
अँटीबायोटिक्सच्या अतिवापराचे दुष्परिणाम :
किरकोळ आजारांसाठी अँटीबायोटिक्स घेतल्याने पचनाशी निगडीत चांगले बॅक्टेरिया कमी होतात, ज्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि मळमळ होऊ शकते.
उलट्या, चक्कर येणे, अतिसार, ओटीपोटात दुखणे आणि ऍलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते.