breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे, पण..’; भाजपा नेत्यांची जरांगे पाटलांवर टीका

Manoj Jarange Patil : महाराष्ट्रात मराठा आरक्षाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलच तापलं आहे. यातच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. दरम्यान, यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर नाव न घेता टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लाढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिलं होतं. काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या आहेत. ही पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करत नाहीत.

हेही वाचा  –  Smartphone Tips : या ३ सोप्या टिप्स वापरून तुमच्या फोनचं स्टोरेज करता येतं कमी!

बाबासाहेबांचं नावंही घेण्यास तयार नाहीत. मात्र यांना आरक्षण पाहिजे..असं कसं चालेल? ७० वर्षे आमच्यावर अन्याय केला गेला. अनेकजण आयएसएस, आमदार, खासदार झाले असते. पण, यापासून आम्ही मुकलो आहोत. आता आमची एकजूट झाली आहे, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकरांच्या त्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो. ते काहीही बोलतात. त्यांनी पाहिलं नसेल, पण मी ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतो. महाडला देखील मी जाऊन आलोय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button