देशात करोनाचे आणखी ४५,८९२ नवे रुग्ण
- देशात गेल्या एका दिवसात
नवी दिल्ली |
४५,८९२ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या तीन कोटी सात लाख नऊ हजार ५५७ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली असून ती चार लाख ६० हजार ७०४ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ८१७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या चार लाख पाच हजार २८ वर पोहोचली आहे, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या १.५० टक्के इतके असून करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९७.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात बुधवारी १८ लाख ९३ हजार ८०० चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांची एकूण संख्या ४२ कोटी ५२ लाख २५ हजार ८९७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत दोन कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५ जण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत करोनामुळे ८१७ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ३२६ जण महाराष्ट्रातील आहेत तर आतापर्यंत एकूण चार लाख पाच हजार २८ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी एक लाख २३ हजार ८५७ जण महाराष्ट्रातील आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.





