Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद, NDRF च्या पाच तुकड्या दाखल

मुंबई : मुंबईत दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना आहेत. अशात आता जास्त पाणी पडल्याने मुंबईत अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. सायन, बोरिवली, कांदिवली इथेही अनेक ठिकाणी पाणी साचल्याची नोंद आहे. पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग बंद करावा लागला आहे.

अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

एनडीआरएफच्या पाच तुकड्या दाखल…

पावसामुळे मुंबईची अवस्था बिकट आहे. सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. अशात हवामान खात्यानेही पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफच्या पाच तुकड्या दाखल केल्या आहेत.

अंधेरी सब-वे पाणी साचल्यामुळे बंद…
पावसामुळे अंधेरी सबवे जलमय झाला आहे. त्यामुळे इथे लोकांची वाहने अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी लोकांना मोठी धडपड करावी लागली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अंधेरी सब-वे सध्या बंद केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तातडीची बैठक…

मुसळधार पावसामुळे मुंबईची अवस्था बिकट आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार आणि इतर अधिकाऱ्यांची पावसाच्या परिस्थितीवर बैठक घेतली. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवून नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button