breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

डॉ. प्रदीप कुरूलकरचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट असे झाले ‘रिकव्हर’

पुणे : डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर याने मोबाइलवरील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन डिलिट केले होते. त्यामुळे न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेला मोबाइल डिकोड करता येत नव्हता. दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) मोबाइल ताब्यात घेऊन फिजिकली कुरूलकर याचे सीमकार्ड ‘६ टी’मध्ये टाकून रीतसर पासवर्डद्वारे मोबाइल सुरू केला.

व्हॉट्सॲप डाऊनलोड करून त्याच्या क्रमांकाचे ॲक्टिव्हेट केले व बॅकअप घेतला असता पाकिस्तानी महिला हेराबरोबर कुरूलकरचे झालेले चॅट रिकव्हर केल्याची माहिती एटीएसच्या अहवालातून समोर आली. पॉलिग्राफ चाचणी करण्याबाबत कुरूलकर व त्याच्या पत्नीला माहिती देण्यात आली आहे. त्यांचे संमतीपत्र मिळाल्यानंतर ही चाचणी केली जाऊ शकते.

हेही वाचा – गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत अजित पवार अन् शरद पवारांचा फोटो

डॉ. प्रदीप कुरूलकरची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. त्याला २९ मे पर्यंत दिली न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत. मधुमेह असल्याने त्याला औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मात्र, कारागृहात घरचे जेवण मिळावे, ही विनंती मान्य केली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button