breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राष्ट्रपती कोविंद यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया

नवी दिल्ली |

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हृदयावर मंगळवारी येथील एम्स रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गेल्या शुक्रवारी लष्कराच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी त्यांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष आहे, असेही निवेदनामध्ये म्हटले आहे.

वाचा- “चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की…”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button