पिंपरी / चिंचवड

मॉर्निंग वॉक करताना महिलेची पर्स हिसकावली

पिंपरी | प्रतिनिधी

मॉर्निंग वाॅक करत असलेल्या महिलेची दोन अनोळखी चोरट्यांनी पर्स काढून नेली. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास विद्यानगर, पिंपळे गुरव येथे घडली.

नलिनी दिनेश पाटील (वय 41, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नलीनी पाटील रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास विद्यानगर पिंपळे गुरव येथील सूर्यनगरी अपार्टमेंट मध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. मॉर्निंग वॉक करत असताना एका मोपेड दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी पाटील यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली. त्यामध्ये पाटील यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 25 हजार रुपये रोख रक्कम होती. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button