breaking-newsTOP NewsUncategorizedक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबई

लखनौच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ जाहीर, रोहित शर्माने कोणाला संधी दिली पाहा…

मुंबईः मुंबईच्या संघाने गेल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे रोहितने यावेळी गेल्या सामन्यातील संघ यावेळी कायम ठेवणार होता, पण संघात आता ह्रितिक शोकिनला संधी देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईचा संघ इम्पॅक्ट खेळाडू म्हणून ते कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना करो या मरो असाच असेल. कारण हा सामना जर त्यांनी गमावला तर त्यांचे आव्हान धोक्यात येणार आहे. लखनौच्या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ हा १२ सामने खेळला आहे. या १२ सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने सात सामने जिंकले आहेत, तर त्यांना पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सात विजयांसह मुंबईच्या संघाचे आता १४ गुण झाले आहेत आणि त्यामुळे ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. लखनौच्या सामन्यात जर त्यांना विजय मिळाला तर त्यांचे १६ गुण होतील आणि ते दुसऱ्या स्थानावर पोहोचतील. पण १६ गुणांनंतर मुंबईचा संघ हा प्ले ऑफच्या दिशेने ठोस पाऊल टाकू शकतो, पण प्ले ऑफमधील त्यांचे स्थान निश्चित होणार नाही. पण जर त्यांचा या सामन्यात पराभव झाला. तर मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याची भिती आहे. कारण या सामन्यात जर त्यांचा पराभव झाला तर यानंतर त्यांच्या हातात फक्त एकच सामना राहणार आहे. या सामन्यात जरी त्यांनी विजय मिळवला तरी त्यांचे १६ गुण होतील आणि १६ गुणांसह ते निश्चितपणे प्ले ऑफमध्ये जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे या सामन्यात नेमकं काय घडतं, याची उत्सुकता आता सर्वांना असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

मुंबईचा या नंतर अजून एक सामना होणार आहे. पण लखनौच्या सामन्यात जर त्यांना विजय मिळाला नाही तर त्यांच्यासाठी प्ले ऑफमध्ये पोहोचणे कठीण होऊन बसणार आहे. त्यामुळे मुंबईच्या संघासाठी लखनौचा सामना हा सर्वात महत्वाचा असणार आहे. पण या सामन्यात मुंबईच्या संघात कोणाला संधी मिळते, हे सर्वात महत्वाचे असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button