पिंपरी / चिंचवड
सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून वृद्ध महिलेचे मंगळसूत्र पळवले
पिंपरी l प्रतिनिधी
सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी वृद्ध महिलेचे मंगळसूत्र फसवणूक करून नेले. ही घटना 7 डिसेंबर रोजी दुपारी राजमाता उड्डाण पुलाच्या खाली, भोसरी गावात घडली. याप्रकरणी 9 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमल जयसिंग आदक (वय 60, रा. गवळी नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवले. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढण्यास आरोपींनी फिर्यादी यांना भाग पाडले. त्यानंतर फसवणूक करून आरोपींनी फिर्यादी यांचे मंगळसूत्र नेले. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.