TOP Newsपिंपरी / चिंचवड

हर घर तिरंगा : भोसरीत भाजपातर्फे तिरंगा यात्रा

  • परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • देशभक्ती जनजागृती अन् एकात्मतेचा दिला संदेश

पिंपरी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भोसरी परिसरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या ७५ व्या स्वतंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ या संकल्पनेनुसार , गायत्री सखी मंच व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पिंपरी – चिंचवड शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी मध्ये विदर्भ मित्र मंडळ, जयदीप पार्क सखूबाई गवळी गार्डन , दिघी रोड , आळंदी रोड , बंसल सिटी या परिसरात तिरंगा यात्रा सोहळा या उपक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे आजी- माजी पदाधिकारी, कामगार नेते सचिन लांडगे, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा च्या सरचिटणीस कविता भोंगाळे -कडू, माजी नगरसेवक सागर गवळी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा स्वाती शिर्के, मनीषा गंगणे, पुष्पा भईय्ये, सुमन उंडे आदी उपस्थित होते.

या उपक्रमा अंतर्गत भोसरी परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, नागरीक, ज्येष्ठ नागरिक, महिला -भगिणी, तरूण वर्ग मोठया प्रमाणात सहभागी झाला होता. या तिरंगा यात्रे दरम्यान विविध राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते, या यात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यानी यात्रे दरम्यान, राष्ट्रउदबोधक घोषणा देऊन, राष्ट्रप्रेमाचे वातावरण भोसरी परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी निर्माण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद…
केंद्र शासनाने या वर्षीच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संपूर्ण देशात “ हर घर तिरंगा ” या संकल्पनेचे उपयोजन करण्याचे आवाहन सर्व नागरीकांना केले होते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात, या तिरंगा यात्रा सोहळ्याचे आयोजन आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, अशी माहीती गायत्री सखी मंच च्या अध्यक्षा व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पिंपरी – चिंचवड शहर जिल्हाच्या सरचिटणीस कविता कडू यांनी व्यक्त केले.

जनमाणसात एकात्मतेचा संदेश पोहोचला पाहिजे…
केंद्र शासनाने २०२२ च्या भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने “ हर घर तिरंगा” हा राबविलेला उपक्रम निश्चीतच स्तुत्य व कौतुकास्पद आहे. भारताला १९४७ साली अनेक राष्ट्रभक्त , क्रांतिकारक यांनी पत्करलेले हौतात्म्य बलिदानाचे फलित म्हणजे भारताचे स्वातंत्र्य ते टिकवून भारताचा विकास साधण्याकरीता जनमानसात ऐक्याचा संदेश पोहोचविणे व सर्वांच्या मनात राष्ट्रहिताची भावना चेतविणे गरजेचे आहे. त्या करीताच भारतीय जनता पक्ष पिंपरी – चिंचवड शहर यांच्या वतीने या तिरंगा यात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सागर गवळी यांनी संगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button