breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्या क्लबवर हातोडा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाविकास आघाडीतील नेत्यांचे बंगले पाडले जात असताना भाजपचे नेते नारायण राणे यांच्या बंगल्यावरही हातोडा चालवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. आता भाजपच्या आणखी एका नेत्याच्या क्लबविरोधात निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा मीरा रोड येथे सेवन इलेव्हन क्लब आहे. अनधिकृत बांधकामप्रकरणी या क्लबवर हातोडा चालवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या क्लबवर लवकरच कारवाई होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते फयाज मुलाजी यांनी या क्लबविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आहेत.

नरेंद्र मेहता यांचा मीरारोड येथील सेव्हन इलेव्हन क्लबला वाढीव एफएसआय दिला आहे. तो चुकीचा असल्याची याचिका फयाज मुलाजी यांनी केली होती. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात २०२१ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होऊन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं आपला राखून ठेवलेला निकाल गुरुवारी जाहीर केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले असले तरीही आदेशी प्रत अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यावर निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मेहता यांनी दिली. तसंच, वाढीव काम अधिकृत करण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे. त्यामुळे, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही मेहता यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button