TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्र

हभप बंडा तात्या कऱ्हाडकर यांची प्रकृती खालावली

साताराः

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ किर्तनकार व प्रवचनकार युवक मित्र ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आल्याने गुरुवारी (दि.१२) सकाळी ७ वाजता त्यांना फलटण निकोप हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून अधिक उपचारांसाठी त्यांना पुणे येथे हलविण्यात आले आहे.
बंडा तात्या कराडकर यांना बुधवारी वडूज (जि. सातारा) आणि पुणे येथे किर्तन करताना थोडा त्रास जाणवला. त्यानंतर किरकोळ औषधे घेऊन त्यांनी पुण्यातच मुक्काम केला. त्यानंतर सकाळी पिंप्रद येथे पोहोचल्यावर त्यांची प्रकृती ठीक वाटत नसल्याने त्यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
निकोप हॉस्पिटलमध्ये हभप बंडा तात्या कराडकर यांच्यावर वैद्यकिय तपासण्या करुन त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ह.भ.प. बंडा तात्यांची प्रकृती सुधारली. रात्री त्यांना झोपही चांगली लागली. मात्र सकाळी पुन्हा पक्षाघाताचा दुसरा झटका आल्याने त्यांना अधिक तपासण्या व अधिक उपचारांसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे डॉ. जे. टी. पोळ यांनी सांगितले आहे.

तरुणांमध्ये व्यसनमुक्तीसाठी जनजागृती
तरुणपिढीमध्ये व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्यासाठी बंडातात्या कराडकर राज्यभर कार्यक्रम घेत असतात. तरुणांमध्ये अध्यात्माची आवड निर्मान व्हावी यासाठी देखील ते प्रयत्नशील असतात. २००८ साली डाऊ कंपनीविरोधात केलेल्या आंदोलनामुळे बंडा तात्या कराडकर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर देखील अनेक आंदोलने त्यांनी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button