breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बेड अभावी रुग्णांना जमीनवर उपचार; वायसीएम रुग्णालयाची विदारक स्थिती

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने वैद्यकीय प्रशासन हतबल झाले आहे. वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील विदारक स्थिती समोर आली आहे. बेड अभावी रुग्णांना चक्क जमीनीवर झोपवून ऑक्सिजन दिलं जात आहे.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नाव आहे. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयातील विदारक स्थिती समोर आली आहे. वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने  रुग्णाला जमिनीवर झोपून ऑक्सिजन दिले जात आहे. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांची मोठी रांग लागलेली आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यवस्था कोलमोडल्याचे दिसून येत आहे. शहरात व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन बेड्स शिल्लक नाहीत. त्यामुळे रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचाराची स्थिती निर्माण झाली आहे.

बेडसाठी प्रतिक्षा

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना पाच ते सहा दिवस महापालिका रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. या रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना दुसरीकडे बेड्स शोधण्याचे सांगण्यात येत आहे. बेड उपलब्ध नसल्यामुळे महापालिका रुग्णालयात फरशीवर झोपूनच इतर कोरोनाबाधित रुग्णांवर ऑक्सिजन लाऊन उपचार केले जात आहेत. याशिवाय बेड्स उपलब्ध होत नसल्यामुळे शहरातील सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.

मनुष्यबळाची कमतरता

गेल्या 15 ते 16 वर्षांच्या सरावामध्ये प्रथमच रुग्णांना बेड्स नसल्याच्या कारणांमुळे जमिनीवर झोपून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे, अशी प्रतिक्रिया उपचार करणारे डॉक्टर देत आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहरासह आसपासच्या जिल्ह्यांमधील रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. शहरातील जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर कोविड सेंटर, नवीन भोसरी रुग्णालय हे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. शहरात विलगिकरन कक्ष वाढवावे लागतील. मात्र, हे सुरू करत असताना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button