breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेच्या वतीने चिंचवडमध्ये भव्य मोफत मराठा वधू वर मेळावा

पिंपरी : सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्था यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात चिंचवडगाव येथे मोफत ८० वा मराठा वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये कै.आनंदीबाई डोके सभागृहात, पोतदार इंटरनॅशनल स्कूलच्या मागे चिंचवड गावामध्ये होणार असल्याची माहिती मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे व सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश हगवणे, पदवीधर संघटनेचे राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी दिली आहे.

आज काल मुलांना लग्नासाठी लवकर मुली मिळत नाही, लग्न जमत नाही. तसेच शेतकरी मुलांसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना देखील वेळ मिळत नसल्यामुळे कोणीही स्थळ दाखवण्यात आता मदत करत नाही. म्हणून अशा वधू वर मेळाव्यांची गरज पडत आहे. मराठा सोयरीक संस्थेने आतापर्यंत ७९ यशस्वी वधू वर मेळावे घेतले आहेत. या संस्थेकडून आतापर्यंत ३००० लग्न पार पडलेले आहे. त्यापैकी ५५० लग्न हे विधवा, विदुर, घटस्फोटीत यांचे पार पडलेले आहेत. धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली शासनमान्य अशी ही संस्था आहे.

हेही वाचा  –  राज्यात ‘पिंक रिक्षा’ योजना लवकरच होणार सुरू! मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

या मेळाव्यासाठी वधू- वरांनी स्वतः येणे बंधनकारक आहे. सोबत फोटो बायोडाटा असावा. अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे स्थळे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी ७४४७७८५९१० या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

या मेळाव्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त वधू वर पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मच्छिंद्र तापकीर, रमेश काळे, संदीप नवसुपे, सतीश काळे, नानासाहेब दानवे, प्रमोद झावरे, योगेश कोतकर व सकल मराठा समाज यांनी केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button